रायगडचा अभिमान! सोमजाई कृपा श्रीवर्धनची तनिषा साखरे राज्यस्तरावर झळकली

274

रायगडचा अभिमान! सोमजाई कृपा श्रीवर्धनची तनिषा साखरे राज्यस्तरावर झळकली

निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123

वाघोडे येथे 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या रायगड जिल्हा कुमारी गट निवड चाचणी स्पर्धेत सोमजाई कृपा श्रीवर्धनची कु. तनिषा सुहास साखरे हिने आपल्या चमकदार आणि कौशल्यपूर्ण खेळाची झलक दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. अचूक तंत्र, कसलेली फिटनेस, शिस्तबद्ध खेळ शैली आणि जिद्दीच्या जोरावर तनिषाने जिल्हा स्तरावरील या कठीण स्पर्धेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

या प्रभावी कामगिरीच्या जोरावर तनिषाची 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान बोपखेल, पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य 52 वी कुमारी गट निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघात निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे फक्त सोमजाई कृपा संघाचाच नव्हे, तर श्रीवर्धन तालुका आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचाही मान अभिमानाने उंचावला आहे.

तनिषाच्या तयारीत तिचे प्रशिक्षक श्रुतिक वाणी आणि सुयोग आगरकर, तसेच संघ व्यवस्थापक रुची बोरकर यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे तनिषाच्या खेळात सतत प्रगती होत गेली आणि यशाचा मार्ग अधिक भक्कम झाला.

राज्यस्तरीय स्पर्धेत तनिषा अतिशय उत्साहाने आणि आत्मविश्वासाने उतरू पाहत असून, तिच्याकडून आता आणखी भक्कम आणि प्रेरणादायी कामगिरीची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रीवर्धन आणि रायगड जिल्ह्यातून तनिषावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.