Home latest News रायगडात नगरसेवक पदासाठी 735 तर नगराध्यक्ष पदासाठी 46 अर्ज वैध
रायगडात नगरसेवक पदासाठी 735 तर नगराध्यक्ष पदासाठी 46 अर्ज वैध
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२९३२५९९३
अलिबाग :- रायगड जिल्ह्यात आता नगरपरिषदेच्या निवडणुकीचा रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील उरणसह एकूण 10 नगरपरिषदांची निवडणूक 2 डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज भरले. नगराध्यक्षपदासह एकूण 217 सदस्य मतदारांना निवडून द्यायचे आहेत. दाखल अर्जांपैकी नगरसेवक पदासाठी 735 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी 46 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी आता प्रचाराचा नारळ फोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड- जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगरपरिषदांमध्ये 107 प्रभाग आहेत. 217 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सदस्यपदासाठी तब्बल 900 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 63 अर्ज दाखल करण्यात आले होते. सर्वांत जास्त अर्ज खोपोली नगरपरिषदेत भरण्यात आले. सदस्यपदासाठी भरण्यात आलेल्या 900 अर्जांपैकी एकूण 735 अर्ज वैध ठरविण्यात आले असून 165 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी भरण्यात आलेल्या 63 अर्जांपैकी 46 अर्ज वैध ठरविण्यात आले असून 17 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.
चैकट:
नगरपरिषद वैध अर्ज सदस्यपद वैध अर्ज नगराध्यक्ष पद
1. खोपोली 169 8
2. अलिबाग 64 5
3. श्रीवर्धन 62 4
4. मुरूड 62 4
5. रोहा 61 3
6. महाड 50 5
7. पेण 87 4
8. उरण 53 5
9. कर्जत 58 5
10. माथेरान 69 3
————————————–
एकूण 735 46