सण २०२२/२३ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर विजय कुणाचा ? कौल कुणाच्या हाती लागणार यावर सरपंच सद्यस्तचे लक्ष
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड :-ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीत अखेर बाजी कोण मारणार याच्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये माणगांव तालुक्यातील १६ ग्रामपंचायत मध्ये मतदान प्रकिया घेण्यात आली तर तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या यामध्ये जनतेतून थेट सरपंच पदाकरिता ४२ उमेदवार तर सद्यस्त पदाकरिता १६६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत अशा २०८ उमेदवाराचे भवितव्य मतदानानी ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले आहे.२० डिसेंबर रोजी निकालची सुनावणी माणगांव प्रशांशकीय भवन येथे होणार असून सर्व सरपंच सद्यस्त याचे लक्ष आता वेधू लागले आहे.
माणगांव तालुक्यातील झालेल्या निवडणुकीकरिता मतदानाचा उत्साह दुपारी कमालीचा होता यामध्ये पुरुष मतदान १४.३३४ तर स्त्री मतदान १४.१०८ मतदान म्हणजे एकूण २८.८४१मतदान दुपार सत्रामध्ये समाविष्ट होते माणगांव तालुक्यात एकूण ६१% मतदारांनी म्हणजे १७.६६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता जनतेतील थेट सरपंच पदासह सद्यस्थ पदाचे उमेदवाराचे भविष्य उद्या होणाऱ्या निकालात होणार आहे.सध्याकाल पर्यंत निवडणुका शांत संयमाने पार पडल्या.
यामध्ये प्रामुख्याने बहुतांशी गावामध्ये विविध विकास पॅनल आणि गांव विकास आघाडी विरुद्ध पॅनल आपल्याला पाहायला मिळाले आहे. खरं तर कौल कोणास मिळणार असे जरी असले तरी राजकीय समीकरण बदल्यानंतर या निवडणुका माणगांव तालुक्यात बाळासाहेबाची शिवसेना शिंदेगट तर महाविकास आघाडी अशी चुरस आपल्याला उद्याच्या निकाळात पाहावंयास मिळणार आहे.