Home latest News १६ वर्षांच्या धावपटूने स्पर्धेत अपयश आल्याने शेतातील कडू निंबाच्या झाडाला गळफास घेऊन...

१६ वर्षांच्या धावपटूने स्पर्धेत अपयश आल्याने शेतातील कडू निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

77

१६ वर्षांच्या धावपटूने स्पर्धेत अपयश आल्याने शेतातील कडू निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधीं
मो 9096817953१६ वर्षांच्या धावपटूने स्पर्धेत अपयश आल्याने शेतातील कडू निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

नागपूर. नागपूर एका घटनेने
हादरले आहे. एका १६ वर्षांच्या धावपटूने स्पर्धेत अपयश आल्याने शेतातील कडू निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चंद्रपूरात एका स्पर्धेत अपयश आल्याने त्याने हे टोकाचे पाऊल नैराश्यातून घेतले आहे.या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निखिल तराळे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तो १० वीत शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तराळे हा उत्कृष्ट धावपटू होता. त्याने काही दिवसांपूर्वी मानकापूर येथील क्रीडा संकुलनात जिल्हास्तरीय स्पर्धेत निखिलने उत्कृष्ट कामगरी केली. त्यामुळे तो चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. मात्र, या स्पर्धेत तो हरला.

हा पराभव त्याच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे तो नाराज असायचा. काल त्याने याच नैराश्येतूनच शेतात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिंगणा पोलीस पुढील तपास करत आहेत.