Home latest News माणगांव तालुक्यातील सणसवाडी येथे शेकोटी शेकत असताना मनात राग धरून केला खून

माणगांव तालुक्यातील सणसवाडी येथे शेकोटी शेकत असताना मनात राग धरून केला खून

64

माणगांव तालुक्यातील सणसवाडी येथे शेकोटी शेकत असताना मनात राग धरून केला खून

माणगांव तालुक्यातील सणसवाडी येथे शेकोटी शेकत असताना मनात राग धरून केला खून

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-माणगांव तालुक्यातील विळे विभागातील मौजे सणसवाडी येथे एकाचा खून झाल्याची घटना आज घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या दरम्यान मौजे विळे आदिवासीवाडी गावच्या हद्दीत विळे हायस्कूलच्या शेतामध्ये सदरील घटना घडली आहे.

दि.17 जानेवारी रोजी रात्री मयत सयाजी धोंडू पवार रा. सणसवाडी हे शेकोटी शेकत असताना त्याच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दि.18 जानेवारी रोजी मयत व आरोपी हे विळे आदिवासीवाडी येथून दारू पिऊन घरी जात असताना विळे हायस्कूल समोरील शेतामध्ये आल्यावर मयत सयाजी पवार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी मुकेश नलावडे यांनी संगनमत करून हाताबुक्याने व कोणत्यातरी हत्याराने जखमी केले झालेल्या मारहाणीमुळे सयाजी पवार याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. र. जि. नं 10/2023 भा. द. वि. स क 302,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलं असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सह. पोलीस. निरीक्षक लहागे हे करीत आहेत