मुबंई गोवा महामार्गवर ट्रक व कार चा भीषण अपघात अपघातात 10 जनाचा दुर्दैवी मृत्यू

46

मुबंई गोवा महामार्गवर ट्रक व कार चा भीषण अपघात अपघातात 10 जनाचा दुर्दैवी मृत्यू

मुबंई गोवा महामार्गवर ट्रक व कार चा भीषण अपघात अपघातात 10 जनाचा दुर्दैवी मृत्यू

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-मुंबई गोवा महामार्गांवर आज दि.19 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास इको कार आणि ट्रक चा भीषण अपघात झालां या अपघातात 9 जनाचा जागीच मृत्यू झालां असून इको कार मध्ये असलेला 4 वर्षाचा बाळ याला गंभीर दुखापत झाली होती परंतु त्याच्या वर उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथून मुबंई जे जे हॉस्पिटल येथे घेऊन जात असताना त्याची ही ज्योत मावळली आहे. हा अपघात इतका विचित्र होत की त्या कार मधील मृताची अवस्था चलबिचलं होती. मुबंई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणारी कार क्र.एम एच 48 बी टी 8673 व गोवा बाजूकडून मुबंई बाजूकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 43 यु 7119यांच्यामध्ये अपघात झाला आहे.

या अपघातात 5 पुरुष 4 महिला आणि 4 वर्षाची मुलगी असे एकूण 10 जण मयत झाले आहेत या पैकी अमोल रामचंद्र जाधव वय वर्ष 40 रा. हेंदवी ता. गुहागर, निलेश चंद्रकांत पंडित वय वर्ष 45 रा. हेंदवी ता. गुहागर, दिनेश रघुनाथ जाधव वय वर्ष 30 रा. हेंदवी ता. गुहागर, निशांत शशिकांत जाधव वय वर्ष 23 रा. विरार पूर्व कोकण निवास नारगी रोड विरार, स्नेहा संतोष सावंत वय वर्ष 45 रा.कलम बिष्ट सावंतवाडी सिधुदुर्ग, कांचन काशिनाथ शिर्के वय वर्ष 58 रा. चिपळूण रत्नागिरी, दिपक यशवंत लाड वय वर्ष 60 रा. कॉटनग्रीन मुबंई, मुद्रा निलेश पंडित वय 12 रा. हेंदवी ता. गुहागर, नंदिनी निलेश पंडित वय वर्ष 40 रा. हेंदवी ता. गुहागर व निलेश पंडित वय वर्ष 04 रा. हेंदवी ता गुहागर हे सर्व मृत झाले आहेत.