Home latest News घोरपडीची शिकार करणार्‍या तीन आरोपींना मुद्देमालासह अटक

घोरपडीची शिकार करणार्‍या तीन आरोपींना मुद्देमालासह अटक

70

घोरपडीची शिकार करणार्‍या तीन आरोपींना मुद्देमालासह अटक

घोरपडीची शिकार करणार्‍या तीन आरोपींना मुद्देमालासह अटक

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

राजुरा : 20 जून
घोरपडीची शिकार करून तिच्या मांसाची विल्हेवाट लावणार्‍या 3 आरोपींना राजुरा येथील वन कर्मचार्‍यांनी धाड टाकून मुद्देमालासह अटक केली.
राजुरा वनपरिक्षेत्राच्या सुमठाणा नियतक्षेत्र अंतर्गत येणार्‍या भेदोडा गावात काही व्यक्तींनी घोरपड आणल्याची गुप्त माहिती राजुराचे क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते यांना मिळाली. याबाबत त्यांनी वरिष्ठ वनाधिकार्‍यांना माहिती दिली. माहिती कळताच उपविभागीय वन अधिकारी पवनकुमार जोंग, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी, वनमजुर यांनी भेदोडा गावात धाड टाकली. यावेळी व्यंकटी रामळू अनमूलवार हा भाजी करण्याच्या उद्देशाने घोरपडीच्या मांसाचे तुकडे करताना दिसून आला. तर संतोष नागुलवार हा शेजारी होता. यावेळी आरोपीची चौकशी केली असता त्याने ही घोरपड शेतात मिळाली असून, या प्रकरणात पुरुषोत्तम देबतवार याचा सहभाग असल्याचे सांगितले. वनविभागाने तीन्ही आरोपींविरूध्द भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपींकडून घोरपडीचे मांस, चामडी, सत्तूर, चाकू जप्त करण्यात आला.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते, वनरक्षक संदीप तोडासे, सुनील गजलवार, पवन मडुलवार, मारोती चाफले, वनमजुर मयूर आत्राम, गंगाधर मोहितकर यांनी केली. पुढील तपास उपवनसरक्षक श्‍वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनात सूरू आहे.
=