Home latest News जॉय सामाजिक संस्थेची वृद्धाश्रमाला मदत

जॉय सामाजिक संस्थेची वृद्धाश्रमाला मदत

88

जॉय सामाजिक संस्थेची वृद्धाश्रमाला मदत

पूनम पाटगावे

जोगेश्वरी, मुंबई

मो: ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- मुंबई महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाणारी जॉय ऑफ गिविंग या संस्थेच्यावतीने नुकतेच विरार पश्चिम येथील न्यू लाईफ फॉर दी एजेड या वृद्धाश्रमाला भेट देण्यात आली. या आश्रमासाठी जीवनावश्यक वस्तू (तांदूळ, डाळ, साखर, कोलगेट, हेअर ऑइल, साबण, बिस्कीट, पोहे, रवा, गाऊन व पॅन्ट ) संचालक राजेश मोरो यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आश्रमातील वृद्धाबरोबर गप्पागोष्टी करण्यात येऊन त्यांची सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न जॉय च्या सभासदांनी केला.

वर्षाची सांगता एका चांगल्या उपक्रमाने करण्यात आल्याचे जॉय चे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी नमूद करून या कामासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले व यापुढेही जॉय च्या वतीने अनेक चांगले उपक्रम सुरूच राहणार असल्याचे सांगितले. यावेळी सर्वांना खिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमासाठी जॉय च्या कार्याध्यक्ष असुंता डिसोझा यांनी पुढाकार घेऊन को- ऑरडिनेट केले.

यावेळी लायन्स क्लब तर्फे आश्रमासाठी दोन नवीन सायकल भेट देण्यात आल्या. तसेच राजभवन ग्रुपतर्फे वृद्धाना नवीन गाऊन व पॅन्ट वितरण करण्यात आल्या. सदर उपक्रम राबविण्यासाठी जॉय चे अनेक सभासद वेळातवेळ काढून उपस्थित होते.