Home latest News कचरा पेटविताना सॅनिटायझर बाटलीचा स्फोट, महिलेचा मृत्यू.

कचरा पेटविताना सॅनिटायझर बाटलीचा स्फोट, महिलेचा मृत्यू.

104

कचरा पेटविताना सॅनिटायझर बाटलीचा स्फोट, महिलेचा मृत्यू.

कागल:- तालुक्यातील बोरवडे येथे घरातील कचरा अंगणात पेटविताना त्यामध्ये पडलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन आग लागल्याने गंभीर भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाला.  सुनीता धोंडिराम काशिद 40 असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ग्रामसेवक धोंडिराम काशिद यांच्या त्या पत्नी होत.

रविवार, 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सुनीता काशिद या घरातील कचरा अंगणात पेटवत होत्या. त्यामध्ये पडलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा अचानक स्फोट झाल्याने, बाटलीतील सॅनिटायझर त्यांच्या अंगावर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या साडीने पेट घेतला. यामध्ये त्या एैशी टक्के भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या.

आजूबाजूच्या लोकांनी आग विझवून त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. गेले आठवडाभर त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दीर, भावजय असा परिवार आहे. या दवाखान्यांची जागा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक निश्चित करणार आहेत. त्यानंतर निविदा प्रक्रिया पार पाडण्यात येईल.