
विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – ९७६८५४५४२२
Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मंगळवारी सादर करण्यात आला. या केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला. गांधी यांच्या टीकेवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या राहुल गांधी यांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या,’ मला अर्थसंकल्पावर लगेच प्रतिक्रिया देणाऱ्यांवर दया येते. अर्थसंकल्प समजून प्रतिक्रिया दिली पाहिजे, त्यानंतर त्यावर उत्तर देऊ शकते. ट्विटरवर अर्थसंकल्पावर अर्थहिन प्रतिक्रिया टाकून फायदा नाही. त्यांनी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी केले पाहिजे, त्यांनी त्यावर बोललं पाहिजे.’
हे आपण वाचलंत का?
- भारतीय सैन्यातील ७८७ जवानांनी केली आत्महत्या.
- सलमान खान: बॉलीवूड मेगास्टारच्या आड दडलेला एक अनोखा चित्रकार
काय म्हणाले होते राहुल गांधी ?
‘यंदाच्या अर्थसंकल्पातून कोणत्याही वर्गाला काही मिळाले नाही. मोदी सरकारचे हे लोकांसाठी ‘झिरो बजेट’ आहे. या अर्थसंकल्पातून कमावता वर्ग, मध्यम वर्ग, युवा, शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही.’, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती.








