या उपक्रमाचे आयोजन स्थानिक सी.आर.एन फाऊंडेशन, एच. एम. बी. पॉवर फिटनेस आणि सूर्या एन्टरप्राइझेस यांच्या माध्यमातृन करण्यात आले होते.

सिद्धांत
२ फेब्रुवारी, मुंबई: गेल्या दोन महिन्यात धारावीच्या कमला नेहरू नगर परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. वारंवार घडणाऱ्या या आगीच्या घटनांमध्ये नागरिकांना स्वतःचा बचाव करता यावा यासाठी शाहूनगर अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आग विझण्याचे प्राथमिक उपाय यासदंर्भात प्रात्यक्षिक सादर करून प्रशिक्षण दिले.
धारावीसारख्या दाटिवाटीची वस्ती असलेल्या परिसरामध्ये घरगुती सिलेंडरला आग लागून दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते. अश्यावेळी स्टेशन इन्चार्ज सावंत यांनी सांगितले कि कोणत्याही आगीची सुरुवात लहानश्या ठिणगीतूनच होत असते. अश्यावेळी घाबरून न जात सावध होऊन तातडीने आग विझवण्याचे उपाय करणे आवश्यक असते.
यावेळी त्यांनी घरगुती सिलेंडरमध्ये लागलेली आग कशी विझवावी याच प्रात्यक्षिक करून दाखवले. सिलेंडरमध्ये लागलेली आग घराच्या भिंतीपर्यंत, वस्तूंपर्यंत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या कपड्याने आगीच्या ठिकाणी जोरजोरात मारल्यास आग विझू शकते. ह्यावेळी सिलेंडर गरम होणार नाही याची काळजी घ्यावी. आग लागलेल्या सिलेंडरवर थंड पाण्याचा फवारा करत राहावा.सिलिंडर कधीही आडवा करू नये. तरीही सिलेंडर गरम झाल्यास तातडीने मोकळ्या जागेत घेऊन जावा. जेणेकरून स्फोट झाल्यास मोठी जीवितहानी आणि वित्तहानी टळू शकेल.
आगीच्या घटनांची चाहूल लागल्यास लवकरात लवकर अग्निशामक दलाला संपर्क करावा, असेही त्यांनी आवाहन केले. ह्यावेळी परिसरातील गृहिणीनी प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होऊन आग विझवण्याच्या उपायांबद्दल जाणुनि घेतले. या उपक्रमाचे आयोजन स्थानिक सी.आर.एन फाऊंडेशन, एच. एम. बी. पॉवर फिटनेस आणि सूर्या एन्टरप्राइझेस यांच्या माध्यमातृन करण्यात आले होते.








