Home latest News जयभीम ॲप सापडले वादाच्या भोवऱ्यात, विरोधक बसले उपोषणाला

जयभीम ॲप सापडले वादाच्या भोवऱ्यात, विरोधक बसले उपोषणाला

97
जयभीम ॲप सापडले वादाच्या भोवऱ्यात, विरोधक बसले उपोषणाला

मीडिया वार्ता टीम
२ फेब्रुवारी, मुंबई: आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत कारण “जय भीम” हा तमाम आंबेडकरी जनतेची अस्मिता आहे. एक न्यायचं प्रतीक आहे आणि ह्या गिरीश वानखेडे नावाच्या व्यक्तीने वाईट कृत्य केल आहे. माझा आक्षेप त्या अँप ला नसून “जय भीम” ह्या नावाला होता. गिरीश वानखेडे ह्या व्यक्तीला २४ जानेवारीला माझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून सांगण्यात आल होत तरी सुद्धा त्या व्यक्तीने “जय भीम” ह्या नावाने ॲप लॉन्च केला. म्हणून आज दि.2/2/2022 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसलो आहे.अश्या शब्दात बहुजन क्रांती पँथरचे राहुलभाई सोळंकी यांनी ॲप संदर्भात आपला विरोध दर्शवला आहे.

आता माझं त्या अँप ला देखील विरोध आहे. कारण त्या अँपवर भविष्यात गुंडागिरी, भाईगिरी, अश्लिल व्हिडीओ टाकले जातील. त्यामुळे केवळ पैसे कामवायच्या हेतूने जर जयभीम या शब्दाच्या अस्मितेला हानी पोहचत असेल, तर तो ॲप बंद झालाच पाहिजे, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर चाललेल्या या उपोषणामध्ये बहुजन क्रांती पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुलभाई सोलंकी नेतृत्त्व करत असून त्यांच्यासोबत जितेंद्र पवार, आकाश चव्हाण,अमोल राठोड, वसिम दाऊदबा,किशोर चव्हाण, गंगाधर चव्हाण देखील उपस्थित आहेत.