गोंडवाना विद्यापीठाच्या उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर सन्मानित

गोंडवाना विद्यापीठाच्या उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर सन्मानित

गोंडवाना विद्यापीठाच्या उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर सन्मानित

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 3 ऑक्टोंबर
गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराकरिता सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांची निवड करण्यात आली असून त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या वर्धापनदिनी प्रदान करण्यात आला.
सोमवार २ ऑक्टोबर २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठाने १२ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत १३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने विविध पुरस्काराचे वितरण, परीक्षा भवन व मॉडेल कॉलेज भवनाचे लोकार्पण सोहळा गडचिरोली येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल ऍन्ड लॉन मध्ये पार पडला. त्यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे हे होते, तर प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा, प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु, डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण , अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्या शाखा डॉ. चंद्रमौली, वित्त व लेखा अधिकारी डॉ. भास्कर पठारे यांच्यासह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांना ३२ वर्षांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असून ते १७ वर्षांपासून ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या विविध महत्त्वपूर्ण समितीचे ते अध्यक्ष तथा सदस्य म्हणून राहिलेले आहेत.
दरम्यान सरदार पटेल महाविद्यालयाचे वार्षिकांकला देखील उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आला. यामुळे महाविद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार,उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहरराव तारकुंडे, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, जिनेश पटेल, आ.किशोर जोरगेवार, संदीप गड्डमवार, सुधाकर पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी प्राचार्य डॉ. पी. एम.काटकर यांचे अभिनंदन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *