मुंबई गोवा महामार्गावर मौजे तिलोरे गावाजवळ ऑटो रिक्षा व शिवशाही बस याच्यामध्ये भिषण अपघात अपघातात तीनजन जागीच ठार….

मुंबई गोवा महामार्गावर मौजे तिलोरे गावाजवळ ऑटो रिक्षा व शिवशाही बस याच्यामध्ये भिषण अपघात अपघातात तीनजन जागीच ठार….

मुंबई गोवा महामार्गावर मौजे तिलोरे गावाजवळ ऑटो रिक्षा व शिवशाही बस याच्यामध्ये भिषण अपघात अपघातात तीनजन जागीच ठार....

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून यां महामार्गवर नेहमीच अपघात घडतं असतात यांच्यातच आज दि.७ एप्रिल 2024 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास माणगांव तालुक्यातील मौजे तिलोरे इंडियन पेट्रोल पंप मानस हॉटेल शेजारी मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणारी शिवशाही बस क्रमांक एम एच 09 एफ एल 0246 व गोवा बाजूकडून ऑटो रिक्षा क्रमांक एम एच 04 एफ सि 6282 यांच्यात भीषण अपघात झाला असून ऑटो रिक्षा चालक मयत प्रविण अनंत मालुसरे वय वर्ष 55 रा.रु नं 602 इंद्रचनू पॅलेस कॉ ऑ. होउसिंग सोसायटी जोगीला मार्केट जवळ उदलघर ठाणे मुंबई, व दत्तात्रय नारायण वर्धेकर वय वर्ष 56 रा संतोषी माता मंदिर टी एम सी डेम्पो आनंदवन गावदेवी शिवाजी पार्क पोलीस नौपाडा ठाणे व तिसऱ्याच नाव समजलं नाही हे तिघेही मृत झाले आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी ऑटो रिक्षा क्रमांक एम एच 04 एफ सि 6282 ही तिलोरे पेट्रोल पंप शेजारी आळी असता रिक्षा चालक यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तसेच हयगयीने बेकायदेशीर समोरून येणारी वाहन नं बघता आपल्या ताब्यातील रिक्षा चालवून हा अपघात केला आहे. यां घटनेची खबर मिळताच माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास माणगांव उप पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस ह. संमेल, पोलीस. ह सानप,व माणगांव वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक पवार वाहतूक पोलीस, बांडे, वाहतूक पोलीस शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *