Home latest News जुन्नरच्या परदेश पुरा मधील शेतकऱ्याचा प्रताप, नाल्याच्या दूषित पाण्यावर पिकवला भाजीपाला

जुन्नरच्या परदेश पुरा मधील शेतकऱ्याचा प्रताप, नाल्याच्या दूषित पाण्यावर पिकवला भाजीपाला

95

 

प्रकाश सोनवणे

जुन्नर:-शहरातील परदेश पुरा विभागातील एक शेतकरी अहमद सय्यद हे परदेशपुरामधून जाणाऱ्या मोठ्या नाल्यांमध्ये वाळूच्या गोण्या लावून पाणी अडवून त्यामध्ये एक इंचाची मोटार लावून दूषित पाण्यावर भाजीपाला पिकवत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.

 

याबाबत परदेश पुरा मधील अनेक तक्रारी नगरपालिकेला प्राप्त झाल्यामुळे मुख्याधिकारी चरणजी कोल्हे, नगर रचना प्रमुख पवार, बांधकाम विभाग प्रमुख श्री राऊत, गटनेत्या वैष्णवी पांडे, नगरसेविका अनुजाताई पातुरकर, नगराध्यक्ष सुजाता मधुकर काजळे, उपनगराध्यक्ष रूपाली परदेशी, सामाजिक कार्यकर्ते बाबा परदेशी, या सर्व टीमने अचानक सदर नाल्यावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असता सदर शेतकऱ्याच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब मोटार काढून घेतली व कोण्या बाजूला करून नाला पुरवत केला.

या प्रकारामुळे विभागात मच्छरांचे साम्राज्य आणि रोगराई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. म्हणूनच अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यासंदर्भात मुख्याधिकारी चरणजी कोल्हे आणि नगराध्यक्ष सुजाता मधुकर काजळे यांनी सदर शेतकऱ्याला बेकायदेशीर काम न करण्याबाबत समज दिली आहे. पुन्हा हा प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे शेवटी सांगितले.