Home latest News माझ्या ग्रामपंचायतीचा सरपंच कसा असावा..? अलिबाग मध्ये एका अनोखा उपक्रम संपन्न

माझ्या ग्रामपंचायतीचा सरपंच कसा असावा..? अलिबाग मध्ये एका अनोखा उपक्रम संपन्न

25

माझ्या ग्रामपंचायतीचा सरपंच कसा असावा?  स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला

भागवत जाधव

अलिबाग: माजी उपसरपंच सौ. प्रणिता म्हात्रे चेंढरे ग्रामपंचायत अलिबाग आयोजित स्पर्धेस भरघोस प्रतिसाद मिळाला जवळपास १०० स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धेमध्ये रंगत निर्माण केली होती.

वरील निबंध हे तृतीय पंचा मार्फत तपासून निर्णय घेण्यात आला सर्व सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सत्कार केला.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ मंडळी श्री. सुरेश देसाई, श्री. नंदकिशोर डोळस,श्री. प्रभाकर माळवदे. श्री. फाटक श्री. अधिकारी उपस्थित होते.त्यांचा सत्कार फुलाचे रोप देऊन करण्यात आला

श्री. साई नगर मित्र मंडळाचे श्री.प्रवीण जाधव श्री.विजय आगलावे,श्री.अभय पाटील, श्री.नांदगावकर, श्री.पानसरे, श्री राजु खेत्री श्री.भावेश परब,श्री. इग्रुलकर आणि इतरांनी. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.

श्री. प्रल्हाद म्हात्रे यांचा दांडगा जनसंपर्क आणि नेहमी हाकेस धावून येणारा जनतेचा नेता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा हा कार्यक्रम एकदम आटोपशीर यशस्वी झाला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अलिबाग उपसभापती सौ.प्रिया प्रमोद भगत यांची उपस्थिती होती

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश कवळे सरांनी एकदम उत्कृष्टपणे केले.  प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री भागवत जाधव यांना मिळाले तर द्वितीय क्रमांकाचे सौ.सुप्रिया पाटील यांना मिळाले आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री.आर.डी. म्हात्रे यांना मिळाले विजेत्यांना चषक दिले गेले.