औरंगाबाद आठ वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी.

54

औरंगाबाद आठ वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी.

घरी कोणी नसल्याची संधी साधत आठ वर्षीय मुलीला आपल्या घरी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला बिडकीन पोलिसांनी फारोळा येथील एका शेतातून अटक केली.

औरंगाबाद:- घरी कोणी नसल्याची संधी साधत आठ वर्षीय मुलीला आपल्या घरी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला बिडकीन पोलिसांनी फारोळा येथील एका शेतातून अटक केली. विकास जगन्‍नाथ नवघरे रा. ता. पैठण असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायधीश आर. एस. निंबाळकर यांनी शनिवारी दिले.

या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली. फिर्यादीला दोन मुले व एक आठ वर्षीय मुलगी आहे. 17 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता फिर्यादी जनावरे चारण्यासाठी चितेगावकडे गेले होते. तर त्यांची पत्नी लग्‍नसाठी गेली होती. त्यांची दोन्ही मुले नातेवाईकांकडे होते. त्यामुळे पीडिता घरी होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पीडिता एकटी असल्याची संधी साधत आरोपी विकास नवघरे हा पीडितेला घरी घेवून आला. पीडिता त्याला घरी जाऊ द्या, अशा विणवण्या करित असताना देखील आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी घरी आले असता पीडितेने ही बाब त्यांना सांगितली. या प्रकरणात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला होता.

पोलिसांनी शोध घेत आरोपीला फारोळा येथील गायरान शेतातून अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक लोकाभियोक्‍ता आर. सी. कुलकर्णी यांनी आरोपीची वैद‍्यकीय तपासणी करणे आहे. गुन्ह्यात कोणी सहकार्य केले, याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.