Home latest News भांडूपगावमध्ये नेतृत्व विकास शिबिर संपन्न

भांडूपगावमध्ये नेतृत्व विकास शिबिर संपन्न

75

भांडूपगावमध्ये नेतृत्व विकास शिबिर संपन्न

डॉ. संजय भोईर

२२ डिसेंबर, मुंबई: भांडूपगाव येथील सार्वजनिक पूजा समितीने ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे मार्गदर्शक संदेश लाळगे यांनी सर्व लोकांना प्रेरित केले. खेळातून कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्णय करण्याचा खूप चांगला प्रयत्न करण्यात आला.

या शिबिराचा संस्थेच्या कार्यकर्त्यांना अतिशय उपयुक्त ठरले.प्रा. जयवंत पाटील यांनी प्रास्ताविक केले, संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय म्हात्रे यांनी पाहुण्यांचे व उपस्थित शिबिरार्थीचे स्वागत केले. संस्थेचे सचिव महेश पाटील आणि प्रविण पवार यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली, शेवटी डॉ. देवदास किणी यांनी सर्वांचे आभार मानले.