महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सामाजिक मंडळ – पंचरत्न मित्र मंडळ

डॉ. संजय भोईर
२२ डिसेंबर, बामणोली:पंचरत्न मित्र मंडळाच्या सामाजिक कार्याचा एक सुखद अनुभव दि १९/१२/२०२२, सोमवार रोजी जि प शाळा बोरगाव व जि प शाळा बामणोली ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, येथील शालेय मुलं व मुलींना मोफत क्रीडा साहित्य, ड्रमसेट, लेझिम तसेच खाऊ वाटप ह्या कार्यक्रमामध्ये घेतला. हया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कर्नल श्री प्रकाश चव्हाण साहेब (विभागीय अध्यक्ष सैनिक फेडरेशन), श्री सुनिल हळदणकर (सरपंच – बोरगाव), श्री नरेश पागडे (उपसरपंच – बामणोली) हे होते.
पंचरत्न मित्र मंडळातर्फे अध्यक्ष- श्री अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड तसेच श्री वैभव घरत, श्री डी एम मिश्रा, श्री रहीम शेख, श्री डी एफ निंबाळकर, श्री तुकाराम वणे, श्री संतोष नाईक, श्री प्रकाश शेजवळ इ. कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री वैभव घरत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे सर्व सभासद, देणगीदार, हितचिंतक यांचे मंडळातर्फे आभार मानण्यात आले. यापुढेही आपले सर्वांचे असेच सहकार्य मंडळाला लाभेल असे आभार प्रकट केले .








