बँक ऑफ बडोदा तर्फे अलिबाग येथे किसान पखवाडा २०२५ चे यशस्वी आयोजन

39

बँक ऑफ बडोदा तर्फे अलिबाग येथे किसान पखवाडा २०२५ चे यशस्वी आयोजन

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग:- बँक ऑफ बडोदातर्फे अलिबाग येथे किसान पखवाडा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तसेच रायगड जिल्ह्यातील विविध शाखांचे शाखा प्रमुखही या कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन किशन नारायणराव जावळे, आयएएस, जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी लाल सिंग, कार्यकारी संचालक, बँक ऑफ बडोदा राजेश मल्होत्रा, मुख्य महाव्यवस्थापक – ग्रामीण व कृषी बँकिंग, आरआरबी व आरसेटी; तसेच सुनील कुमार शर्मा, महाव्यवस्थापक व विभागप्रमुख, मुंबई विभाग यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास जी. एस. हराळ्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी); सौ. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, एमएसआरएलएम, रायगड; तसेच पांडुरंग ए. बामणे, सहाय्यक व्यवस्थापक, एपीईडीए यांनीही उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील ७०० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी मा. कार्यकारी संचालकांनी किसान पखवाडा उपक्रमाचे महत्त्व विशद केले तसेच महिला स्वयं-सहायता गटांनी दर्शविलेल्या उत्स्फूर्त सहभागाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान स्वयं-सहायता गट, फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो, बीकेसीसी तसेच ट्रॅक्टर कर्ज या विविध कर्ज योजनांअंतर्गत मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षितता व सायबर फसवणूक प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी नुक्कड नाटक सादर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मनीष कुमार सिन्हा, प्रादेशिक प्रमुख, नवी मुंबई विभाग यांनी उपस्थितांचे आभार मानले व शेतकऱ्यांना त्यांच्या बँकिंग गरजांसाठी बँक ऑफ बडोदाच्या शाखांना भेट देण्याचे आवाहन केले. तसेच सर्व ग्राहकांना तत्पर व कार्यक्षम सेवा देण्याचे आश्वासन दिले.

किसान पखवाडा २०२५ उपक्रमामुळे बँक ऑफ बडोदा शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकेल व सर्वसमावेशक व दर्जेदार बँकिंग सेवा देण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.