कुणबी समाजोन्नती संघ मुंबई २०२६ दिनदर्शिका प्रकाशन व विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न
संतोष उध्दरकर
म्हसळा: कुणबी समाजोन्नती संघ शाखा मुंबई तालुका म्हसळा, मुंबई संलग्न महिला मंडळ, युवक मंडळ व क्रीडा मंडळ आयोजित कुणबी समाजोन्नती संघ मुंबई २०२६ दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा व विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबीर तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार २१ डिसें. रोजी बोरीवली पूर्व. मुंबई, श्रीकृष्ण सभागृहात शाखेचे अध्यक्ष . महेंद्र टिंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विद्यार्थी करीअर मागदर्शन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या शाखेच्या वतीने गेली अनेक दशके हा उपक्रम अविरतपणे दर वर्षी राबविण्यात येत असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले, तसेच २०२६ ची दिनदर्शिका म्हसळा तालुक्यातील ७७ गावांमध्य प्रत्येक घराघरात लावण्यात येते असेही सांगण्यात आले. हा उपक्रम राबविण्याचे मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक प्रचार, प्रसार वाढविणे हे मुख्य कारण आहे.
त्यामुळे समाजाचा आलेख व प्रगती दिसुन येते व त्या मधून मिळणारे उत्पन्न मधुन या प्रकारे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे अध्यक्ष महेंद्र टिंगरे यांनी सांगितले. यावेळी प्रो. तज्ञ सूरज जाधव यांनी अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थिती अध्यक्ष महेंद्र टिंगरे, सचिव राजु धाडवे, बबन उंडरे, महेश शिर्के, शाखा उपाध्यक्ष हेमंत रामाणे, महेश शिर्के, अशोक भुवड, अनिल बांद्रे, सहसचिव अनिल काप,अजित उंडे, मनोज मोरे, कल्पेश जाधव, प्रविण भोगल, सह खजिनदार अंकुश कांबळे,युवक अध्यक्ष रुपेश भोगल, युवक सचिव उमेश पोटले, प्रचारक महेंद्र घडशी, क्रिडा अध्यक्ष विजय बोर्ले, सल्लागार राजाराम गावडे, कृष्णकांत गजमल, तळवडे विभाग अध्यक्ष राकेश पेंढारी, संदेरी विभाग अध्यक्ष विलास बोर्ले, ठाकरोली विभाग अध्यक्ष नथुराम भुवड, सचिव सदानंद आग्रे, चिखलप विभाग अध्यक्ष दत्ताराम बोर्ले, सचिव सुभाष कदम, आदी मान्यवर, पदाधिकारी,महिला मंडळ उपस्थित होते.









