कराटे स्पर्धेत रा. म. गांधी महाविद्यालय, नागभीडच्या विद्यार्थीनी कु. जागृती मरस्कोल्हे हिला सुवर्ण पदक

*अरुण रामुजी भोले*
*नागभीड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड जिल्हा चंद्रपूर येथील विद्यार्थिनी कु. जागृती मरस्कोल्हे हिने कराटे मधील कुमीटी या प्रकारच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धा हि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कु. जागृती मरस्कोल्हे हिला प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून प्रा. विक्की तुळशीराम पेटकर व श्री हिरा यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
या विद्यार्थीनीच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव, मा. मनोजभाऊ वनमाळी, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अनिल एन. कोरपेनवार आणि प्रा. विक्की पेटकर, संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तसेच समस्त प्रध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.








