लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे व राजुरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मा. अरुणभाऊ धोटे यांचे नेतृत्वात नगरपंचायत सभापती पदांची निवड….
नगरपंचायत गोंडपिपरी येथे विविध विभागाच्या सभापती पदांची निवड

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- गोंडपिपरी येथील नगरपंचायत येथे झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर आज दिनांक २३/०२/२०२२ रोजी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे व राजुरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री.अरुणभाऊ धोटे यांचे प्रमुख नेतृत्वाखाली नगरपंचायत गोंडपिपरी मधील विविध विभागाच्या सभापती पदांची निवड करण्यात आली.
ज्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक श्री.सचिन चिंतावार यांची पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती म्हणून निवड करण्यात आली,श्री. सुरेश चीलनकर यांची बांधकाम सभापती म्हणून निवड करण्यात आली,सौ. वनिताताई वाघाडे यांची महिला व बालकल्याण सभापती म्हणून निवड करण्यात आली तसेच गोडपिपरी तालुक्यातील युवकांची आन-बान शान श्री. राकेशदादा पुन यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली.
निवड कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने गोंडपिपरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. सविताताई कुडमेथे, उपनगराध्यक्ष सौ. सारिकाताई मडावी, नगरसेवक अनिलभाऊ झाडे, नगरसेविका शारदाताई गरपल्लीवार, नगरसेवक यादवराव बांबोळे, नगरसेविका रंजनाताई रामगिरकर, नगरसेविका वनिताताई देवगडे,शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीपभाऊ करपे, गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तुकाराम झाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार, शिवसेना तालुका प्रमुख सूरजभाऊ माडुरवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष बंडावार, पोडसा ग्रामपंचायतीचे सरपंच देविदास सातपुते, सेवा सोसायटी अध्यक्ष अनिल भाऊ झाडे, माजी नगरसेवक प्रवीण नरहरशेट्टीवार, काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील फुकट, बबलू भाऊ कुलमेथे, बालुभाऊ झाडे, अखिल गजेडीवार यांची उपस्थिती होती.
विविध विभागावर सभापती म्हणून निवड झालेल्या नगरसेवकांचे व नवनिर्वाचित नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन








