Home latest News बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यात शॉटसर्किटने लागलेल्या आगीत आई आणि मुलीचा जळुन मृत्यू.

बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यात शॉटसर्किटने लागलेल्या आगीत आई आणि मुलीचा जळुन मृत्यू.

88

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड,दि.23 मे :- बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातुन एक हृदय हेलवणारी बातमी समोर आली आहे. शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत आई आणि मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना किट्टीआडगाव परिसरात रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.

शशिकला शंकरराव फफाळ वय 65 वर्ष व त्यांची मुलगी सखुबाई शंकरराव फफाळ वय 45 वर्ष अशी मयतांची नावे आहेत. त्या घरात झोपलेल्या होत्या. यावेळी अचानक शॉर्टसर्किटने घरात आग लागली. या आगीत दोघींचाही होरपळून जागीच मृत्यू झाला.

घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची आणि त्यात आई आणि मुलगी फसून असल्याची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंडगे, उपनिरीक्षक निलेश इधाटे, कर्मचारी राठोड यांनी धाव घेतली. पंचनामा सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.