चौडमपल्ली येथे शाळकरी मुलांद्वारे रास्ता रोको आंदोलन 

चौडमपल्ली येथे शाळकरी मुलांद्वारे रास्ता रोको आंदोलन 

चौडमपल्ली येथे शाळकरी मुलांद्वारे रास्ता रोको आंदोलन

ता.प्रतिनिधी मुलचेरा / महेश बुरमवार

मो.न. 9579059379

 

मौजा चौडमपल्ली येथून आष्टी ला रो विद्यार्थी शिक्षणा साठी जात असतात पण वेळेवर बस येत नाही 5 वा. सुट्टी झाल्यावर सुध्दा 2 तास बसची वाट बघावी लागते म्हणून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांने रस्त्यावर उतरून काही काळ वाहतूक थांबवली ..हि घटना आष्टी चे ठाणेदार यांना माहीत होताच घटनास्थळी धाव घेत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांची बोलुन विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे सुचना दिले व काही वेळानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.. सुरजागड लोह वाहतूक करणारी हजारो वाहनांमुळे रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत..व वाहनांमुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.याचा रोष आज चौडमपल्ली येथील शाळकरी मुले ,व गावातील सर्व नागरिक रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले… शाळकरी मुलांना या वाहनांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे..

आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र सुरजागड लोह वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने शेकडो चालतात,या मुळे रस्त्यावर पडलेले खड्डे व धुळ या मुळे या महामार्गावर प्रवास करणे कठीण आणि धोकादायक झाले आहे…या राष्ट्रीय महामार्गावर रोज एक तरी अपघात घडत असतो,आणि रोज एकाद्या ठिकाणी एकादी सुरजागड लोह वाहतूक वाहन पसल्या जाते आणि त्यामुळे तासनतास ट्रॅफिक जॅम होत असते..या राष्ट्रीय महामार्गावर हि अवस्था असुन सामान्य माणसाला खुप खुप खुप त्रास सहन करावा लागत आहे..तरी शासन , प्रशासन, लोकप्रतिनिधी गप्प का ? हा सर्व सामान्य माणसाला पडलेला प्रश्न…या भागातील लोकप्रतिनिधी का समोर येत नाही ,शासन का लक्ष देत नाही, असे अनेक प्रश्न जनता कडून विचारल्या जात आहे..असेच जर चालत राहील तर आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर असणारे सर्व गावातील लोक रस्त्यावर येऊन पुर्ण पणे चक्का जाम आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here