Home latest News आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग बंद  सूरजागड लोह वाहतूक वाहनांमुळे

आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग बंद  सूरजागड लोह वाहतूक वाहनांमुळे

132

आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग बंद  सूरजागड लोह वाहतूक वाहनांमुळे

आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग बंद  सूरजागड लोह वाहतूक वाहनांमुळे

ता.प्रतिनिधी मुलचेरा / महेश बुरमवार

मो.न.9579059379

 

मुलचेरा – तालुक्यातील लगाम ते बोरी या 5 कि.मी.अंतरावर सुरजागड लोह वाहतूक करणारी वाहने दोन ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध फसल्याने ट्रॅफिक जॅम झालेली आहे…लगाम आणि बोरी दोन्ही बाजूला शेकडो वाहनांची रांग लागली आहे..काल रात्री पासून राष्ट्रीय महामार्गावर जॅम असून सगळं वाहतूक खोळंबली आहे… शाळकरी विद्यार्थ्यांना पायी जावे लागत आहे..दोन ठिकाणी वाहने फसल्याने ट्रॅफिक सुरळीत व्हायला बराच वेळ लागणार….असे हे त्रास किती दिवस सहन करायचा , त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी ने पुर्ण गडचिरोली जिल्हा आणि रस्ते विकत घेतली आहे का?

मा.आमदार, खासदार, मंत्री महोदय,शासन, प्रशासन यांना विनंती आहे की या अडचणी वर लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी नागरिकांची विनंती आहे…