नवीन कृषी धोरण शेतीसोबतच रोजगार भिमुख व्हावे : आमदार प्रतिभाताई धानोरकर

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चंद्रपूर :- कृषी शिक्षणसंदर्भात नवीन धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवर सदस्य पदी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीची पहिली बैठक पुणे येथे पार पडली. त्यामध्ये आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महत्वाच्या सूचना उपस्थित केल्या. त्यामध्ये नवीन कृषी धोरण शेतीसोबतच रोजगार भिमुख व्हावे यासाठी कृषीचे नवीन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवीन प्रवेश प्रक्रिया निर्माण करणे, कृषी अभ्यासक्रमात नवीन विषय घेणे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाकडे वाळविणे, नवीन कृषी महाविद्यालयाला मान्यता देणे अशा नवीन विषय उपस्थित करण्यात आले. या बैठकीत आमदार राहुल पाटील, आमदार शेखर निकम व अमरावती, अकोला, राहुली, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.
वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेती करण्यात येते. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता शेतीच्या बांधावर शेतकऱ्याशी संवाद साधत त्यांचे प्रश्न निकाली काढले होते. शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. अभ्यासू आमदार अशी प्रतिभाताई धानोरकर यांची ओळख आहे. त्यांनी अल्पावधीतच महिला आमदार म्हणून ओळख निर्माण केली आहे. कृषी बद्दल त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती ओळखून त्यांची हि निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून नाव नवीन बाबींच्या समावेश करण्यात येईल व कृषी अभ्यासात विज्ञानाची व व्यवसायाची जोड देण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरील बाबी अभ्यासक्रमात आल्यास कृषी बद्दल युवकांच्या कल वाढेल अशी अशा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली.








