वाडगाव येथे दहावी परीक्षा पूर्व मार्गदर्शन शिबीर

71

वाडगाव येथे दहावी परीक्षा पूर्व मार्गदर्शन शिबीर

बापदेव सामाजिक सेवाभावी संस्था चा उपक्रम

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- बापदेव सामाजिक सेवाभावी संस्था व ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव यांच्या सहकार्याने १० वी परीक्षा पूर्व मार्गदर्शन शिबीर रविवार दिनांक. 23/99/20२५ रोजी रा. जि.प. शाळा-वाडगाव येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्‌घाटन वाडगाव ग्रामपंचायत सरपंच श्रीमती सारिका पवार व उपसरपंच श्री. जयेद्र भगत यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आले.या प्रसंगी बापदेव सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश भगत, उपाध्यक्ष प्रदीप आंग्रे, सचिव प्रभाकर भगत, खजिनदार श्री नंदकुमार थळे, श्री .भास्कर भगत, श्री .शंकर पाटील, श्री. दिलिप ठाकूर सर्व सदस्य माजी सरपंच सिताराम भगत, पोलीस पाटील श्री .नथुराम म्हात्रे , प्रविण भगत मुख्याध्यापक श्रीमती. सुगंधा पाटील. तज्ञ मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
शिबिरात वाडगांव सह पंचक्रोशीतील एकुण ६७ वि‌द्यार्थी सह‌भागी झाले होते.या शिबिरात तज्ञ मार्गदर्शक म्हणून इंग्रजी विषया साठी के.डी.पाटील सर,हिंदी विषयासाठी बीपीन राऊत सर , संस्कृत विषया साठी श्रीमती किरण करंदीकर मॅडम , गणित विषय साठी एस. के. म्हात्रे सर ,समाजशास्त्र या विषया साठी श्रीमती शुभांगी भगत,मराठी विषयासाठी श्रीमती नेहा थळे तर विज्ञान विषयासाठी भानुशाली सर यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व त्याच्या शंकाचे निरासन करून परीक्षा पद्धतीची माहिती दिली.