Home latest News अलिबाग मधील प्रभाग सात मध्ये आघाडीचा प्रचाराचा जल्लोष

अलिबाग मधील प्रभाग सात मध्ये आघाडीचा प्रचाराचा जल्लोष

80

अलिबाग मधील प्रभाग सात मध्ये आघाडीचा प्रचाराचा जल्लोष

ॲड. मानसी म्हात्रे यांचे मतदारांकडून स्वागत

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. प्रभाग सातमधील नगरसेवकपदाचे उमेदवार ॲड. मानसी म्हात्रे आणि अभय म्हामुणकर यांचा प्रचार सोमवारी सायंकाळी मारुती नाकासह वेगवेगळ्या परिसरात करण्यात आला. घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले. यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांकडून मिळत असल्याचे चित्र दिसून आले. यावेळी प्रचाराचा जल्लोष पाहावयास मिळाला.

थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षया प्रशांत नाईक, नगरसेवकपदासाठी प्रभाग सातमधून ॲड. मानसी संतोष म्हात्रे, अभय म्हामुणकर.
हे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग सातमधील नगरसेवक पदाच्या उमेदवार ॲड. मानसी संतोष म्हात्रे, अभय म्हामुणकर यांचा सोमवारी सायंकाळी अलिबाग शहरात प्रचार करण्यात आला. शहरातील मारुती नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मतदारांना भेटून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रचारादरम्यान मतदारांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदारांकडून ॲड. मानसी म्हात्रे, अभय म्हामुणकर या उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सतीश प्रधान, शेकाप तालुका कार्यालयीन चिटणीस अशोक प्रधान, ॲड. संतोष म्हात्रे, विवेक म्हात्रे, रितेश म्हात्रे, महेंद्र पाटील, अभि पारसनीस, प्रमोद पाटील, अविनाश सुर्वे, अनिकेत झालेराव, तेजस साळवी, आशिष थळे, प्रशांत जाधव, प्रथमेश आंबवणे, मयुरेश आंबवणे, विश्वेष पिकळे, भूषण जगे आदी महाविकास आघाडातील शेकाप व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.