ठाणे/ नवी मुंबई
तुर्भे रेल्वे स्थानकासमोर वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याची घटना ठाणे-बेलापूर मार्गावर शनिवारी सकाळी घडली. तर, कारमधील दोघांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ठाण्यात घडली. या प्रकरणी अनुक्रमे तुर्भे एमआयडीसी आणि कापुरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
तक्रारदार पोलिस हवालदार संदीप ढवळे हे शनिवारी सकाळी रिक्षाचालकांना रिक्षा बाजूला घेण्यास सांगत होते. मात्र सायबन्ना कांबळे या रिक्षाचालकाने पळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ढवळे यांनी लायसन्सची मागणी केली. मात्र कांबळे याने ढवळे यांना धक्काबुक्की केली.तर, शुक्रवारी घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलिस नाईक नंदकुमार भोसले (४८) कार्यरत होते. रात्री ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने सिग्नल तोडला. दंड भरण्याची भोसले यांनी कारचालकाला विनंती केली. त्यावेळी कारमधील दोघांनी भोसले यांना मारहाण केली. जगदीश बिमानी (४३) आणि कारचालक रवी संपत (५६) या दोघांना अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here