Home E-Paper मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते मराठा भवन उद्घाटन

मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते मराठा भवन उद्घाटन

229

मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे रविवार खांदा कॉलनी वसाहतीमध्ये होणार आगमन 

संजय कदम 

पनवेल : मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पनवेल च्या ऐतिहासिक भूमीत दाखल होणार आहेत.

      सकल मराठा समाज मंडळ खांदा वसाहत येथे रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा भवन उदघाटन व मराठा कृतज्ञता मेळावा या कार्यक्रमानिमित्त मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील येणार असून या कार्यक्रमासाठी पनवेल मधील आपण सर्व समाज बांधवानी आवर्जून उपस्थित राहावे व समाज कर्तव्य बजवावे अशी आग्रहाची विनंती संतोष जाधव यांनी केली आहे .