Large scale corruption in Wadner Gram Panchayat.
Large scale corruption in Wadner Gram Panchayat.

वडनेर ग्राम पंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार.

 Large scale corruption in Wadner Gram Panchayat.

✒प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि 25 मार्च :- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्याल वडनेर ग्राम पंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार सुरु असल्याचे समोर येत आहे. गुरूदयाल सिंग सुवर्ण सिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर यांनी केली चौकशीची मागणी केली आहे.

शासनाने स्वच्छ भारत अभीयाना अंतर्गत शौचालय बांधकामासाठी पैसे देण्यात येत आहे. पण शासनाच्या नियमानुसार कुठलाही व्यवहार हा पारदर्शक असला पाहिजे म्हणून चेक देण्याची पद्धत लागु केली. पण ते चेक अकाउंट मध्ये लावणारे असायला हवे अशी अट असतांना, सरसकट बॅरल चेक दिले जात असल्याचे समोर आले आहे. वडनेर ग्राम पंचायत सचिव हरीदाजी विठोबाजी रामटेके आणि वडनेर ग्राम पंचायतचे उपसरपंच सुभाष शिंदे यांच्या संगमताने मोठ्या प्रमाणात भष्ट्राचाराचे सम्राज उभारले असल्याचे बोलले जात आहे.

वडनेर ग्राम पंचायत सचिव हरीदाजी विठोबाजी रामटेके हे बॅरल चेक देऊन उपसरपंच सुभाष शिंदे नावाने बॅरल चेक यांना देऊन पैसे काढण्याचे काम माघिल अनेक दिवसांपासून सुरु आहे. गावातील नागरीकानी यावर प्रश्न उपस्थीत केला आहे. बॅरल चेक कसं का दिला जातो, चेक घेऊन त्यावर खोटी सही मारून पैसे काढण्याचा गोरखधदा सुरु आहे. बळवंता सुधाकर फाटे यांचे नावाचे चेक आणि गावातल्या उपसरपंच सुभाष शिंदे यांचे नावाशी काही संबंध आहे. वडनेर ग्रामपंचायत सचिवाने बॅरलचे का दिला. बॅरलचेक देता येत नाही. आणि 23 सप्टेंबर 2020 महिन्यामध्ये बळवंता सुधाकर फाटे यांने शौचालयाचे बांधकाम नकरता हा चेक कसा का उचलला. ज्या व्यक्तीने शौचालयाचे बांधकामच केले नाही, त्यांचे नाव शौचालयाचा बांधकामाच्या लिस्टमध्ये कसे आले हा खूप मोठा प्रश्न आहे.

बळवंता सुधाकर फाटे यांने शौचालयाचे बांधकाम 10 फरवरी 2021ला सुरू केले. सुभाष शिंदे यांनी खोटी सही करून खुर्चीच्या गैरवापर केला. ग्राम पंचायत सचिव रामटेके यांनी पण आपल्या पदाचा गैरवापर करून आणि बळवंता सुधाकर फाटे या सर्व लोकांनी शासनाच्या डोळ्यावर धुळ झोकून अनुदानाचे पैसे लाटण्याचा पराक्रम केला आहे. गट विकास अधिकारी हिंगणघाट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा या भष्ट्राचाराची चौकशी करून ठोस कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले.

लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राम पंचायत वडनेर माघील अनेक दिवसा पासुन बोगस कारभार सुरु आहे. या सर्व भष्ट्राचाराची चौकशी करण्यात यावी. शासनाच्या अनेक योजनेचा वडनेर गावातील गरीब लोकांना दिला जात नाही. शौचालय बांधकामाचे अनुदान दोन वर्ष झाले देण्यात आले नाही.

वडनेर ग्राम पंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु आहे. यांची चौकशी करण्यात यावी आणि या मध्ये किती लोक सामील आहे यांची संपुर्ण चौकशी झाली पाहिजे. नाही तर या भष्ट्राचार विरोध्यात उपोषण करणार आहे.
गुरूदयाल सिंग सोरन सिंग जुनी वडनेर ग्रामपंचायत सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here