Home latest News वडनेर येथे 40 वर्षीय महिलेने घेतला गळाफास.

वडनेर येथे 40 वर्षीय महिलेने घेतला गळाफास.

81

वडनेर येथे 40 वर्षीय महिलेने घेतला गळाफास.

महिलेने घेतला गळाफास.
महिलेने घेतला गळाफास.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
वडनेर,दी 25 मार्च:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे 40 वर्षीय महिलेने गळाफास घेउन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लक्ष्मीईने अमोल लोखंडे वय 40 वर्ष रा. वडनेर असे गळाफास घेतलेल्या महिलेच नाव आहे. वडनेर पोलिसांनी पंचनामा करुन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

प्राप्त माहितीनुसार मयत लक्ष्मी लोखंडे यांचे पती अमोल लोखंडे हे वीज वितरण उपकेंद्र वाढोना बाजार येते सेक्युरीटी गार्ड म्हणून काम करते. अमोल लोखंडे आणि लक्ष्मीच लग्न हिच्यासोबत 21 वर्षापूर्वी झाले. त्यांना 1 मुलगा पंकज वय 18 वर्ष व मुलगी पायल वय 16 वर्ष असून आई वडील 2 मुले अस माझा परिवार आहे. दि. 25 मार्च रोजी सकाळी अंदाजे 6 वाजताच्या दरम्यान लक्ष्मीने पती व सास-यांना चहा बनवून दिला. मयत लक्ष्मी ही घरकाम करत होती मुलगी व मुलगा झोपूनच होते चहा पीयुन पती फिरायला गावात गेला. बसस्टॉपवर उभे असताना त्यांना त्यांचा मावसभाऊ खुशाल चहांदे याने 7.30 वाजताचा सुमारास सांगितले की लक्ष्मीने घराचे दरवाजे बंद करून गळफास घेतला आहे. तेव्हा मयत लक्ष्मीचे पती अमोल आणि खुशाल असे दोघेही घराकडे निघाले. तर घराचा दरवाजा आतून बंद होता. तर पत्नी लक्ष्मीने गळफास घेतलेला दिसला.

पतीने दिलेल्या बयान वरुन माझी पत्नी लक्ष्मी ही मागील 10 दिवसापासून घरामध्ये कोणालाही काही बोलत नवती ती काही दिवस पासून चिंतेत राहत होती माझी पत्नी मयत लक्ष्मी अमोल लोखंडे वय 40 वर्ष हे हिने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली तिचे मरणात माझा कोणावर काही संशय नाही तरी तिच्या मरणाबाबत चौकशी व्हावी म्हणून मी वडनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. पुढील तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक राजू सोनपित्रे हे पुढील तपास करीत आहे.