Home latest News स्वस्त सोने पडले महागात… म्हसळ्यातील व्यापार्‍याला १५ लाखाला गंडवले

स्वस्त सोने पडले महागात… म्हसळ्यातील व्यापार्‍याला १५ लाखाला गंडवले

21

फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी म्हसळा पोलीसांच्या जाळ्यात

संतोष उद्धरकर

म्हसळा: म्हसळा शहरातील एका व्यापाऱ्याला खरे सोने भासवून बनावट दागिने देत 15 लाखाला गंडवले होते, या प्रकरणात म्हसळा पोलिसांनी तात्काळ तपासाचे सूत्र हलवत फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळीतील आरोपीना अटक करण्यात आली आहे,

सविस्तर वृत्त असे कि,15 मे रोजी म्हसळा शहरातील एका व्यापाऱ्याला तीन जणांनी आमच्या कडे सोन्याचे दागिने आहेत. आम्हाला पैशाची गरज असून ते आम्ही स्वस्तात देतो असे सांगितले. व्यापारी त्यांच्या कडील सोन्याची चैन तपासणी करिता गेला असता त्या तीन जणांनी व्यापाऱ्याच्या ऑफिस मधील पैशाची पिशवी घेत पसार झाले.या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 1)आरोपी केसाराम सावजी बागरी, वय वर्ष 47 रा. राणीवाडा, राजस्थान, 2) मोहनलाल गंगाराम परमार वय 42 रा.बाबुरा लगामरा ता, राजस्थान,3 ) अनिल हरिराम परनार वय वर्ष 26 रा. बागरीयो का बेरा, डकात्रा, राजस्थान,4 ) जिंतेद्रकुमार मोहनलाल परमार वय 27 वर्ष रा.बागरा रोड, डकात्रा, राजस्थान,5 ) राजु शिलाराम राठोड वय वर्ष 27 रा. छेलाराम बागरीयो का वास, ता. भिमनाल, राजस्थान .या सर्व पाच आरोपींना पोलिसांनी रोहा तालुक्यातील किल्ला येथून ताब्यात घेतले असून या मध्ये हे सर्व आरोपी राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील असून गावोगावी फेरीचे काम करतात.

या सर्व आरोपींवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजी. क्र. 75 / 2026 भा. न्या. सं. 2023 चे कलम 318 (2), 318 (4), 3 (5 ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून रायगड पोलीस अधिक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी सविता गर्जे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यवाही पथक सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे, पो.ह. वा. सचिन शेलार, पो. शि.सागर चितारे, पो. शि. शौकत मुल्ला, पो. शि. विवेक ठाकरे, पो. शि. अक्षय पूरी यांच्या कडुन अधिक तपास करण्यात येत आहे.

पोलिसांकडून आवाहन…

कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, तुमची फसवणूक झाली तर तक्रार दाखल करा किंवा 112 वर फोन करा, तुमच्या तक्रारी बाबतीत गोपनियता बाळगली जाईल, अधिकृत सराफा कडुनच पूर्ण खात्री करून सोने खरेदी करा. रायगड पोलीस सदैव आपल्या सोबत आहेत.