Home latest News कळमेश्वर पाेलिसांची येरला परीसरात सुरु असलेल्या जुगारावर धाड.

कळमेश्वर पाेलिसांची येरला परीसरात सुरु असलेल्या जुगारावर धाड.

79

कळमेश्वर पाेलिसांची येरला परीसरात सुरु असलेल्या जुगारावर धाड.

कळमेश्वर पाेलिसांची येरला परीसरात सुरु असलेल्या जुगारावर धाड.
कळमेश्वर पाेलिसांची येरला परीसरात सुरु असलेल्या जुगारावर धाड.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
कळमेश्वर:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर पाेलिस पथकाने रविवारी सायंकाळच्या सुमारास येरला परिसरात सुरु असलेल्या जुगारावर धाड टाकत जुगार खेळत असणा-या चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 46 हजार 85 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये नरेश उडनलाल ठाकूर वय 40 वर्ष, सुनील निवृत्त दवंडे वय 40 वर्ष, हेमंत राजू माेंडे वय 20 वर्ष व गाेलू ऊर्फ रामेश्वर देवशंकर वर्मा वय 29 वर्ष चाैघेही रा. येरला, ता. नागपूर (ग्रामीण) यांचा समावेश आहे.

कळमेश्वर पाेलिसांची टिम पेट्रोलीग करिता निघाली असताना त्यांना येरला येथील डागा मूकबधिर शाळेजवळ मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या टीमने पाहणी केली व जुगार खेळला जात असल्याचे स्पष्ट हाेताच धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 4,085 रुपये राेख, 49 हजार रुपयांचे तीन माेबाईल हॅण्डसेट, 92 हजार रुपयांच्या देान माेटरसायकली व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 1 लाख 46 हजार 85 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली.

याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, हवालदार राजकुमार काेल्हे, ललित उईके, राजेश कुमरे, स्वप्निल लाकडे यांच्या पथकाने केली.