Home latest News हनुमान मुर्तीच्या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश

हनुमान मुर्तीच्या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश

64

हनुमान मुर्तीच्या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश

अंकुश कोट्टे 

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधि 

मो.न.९१६८२५७७९६

चंद्रपूर, दि. 24 : बल्लाेरपूर तालुक्याीतील विसापूर हेगावानजिक भिवकुंड नाल्यादजवळ श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्या प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कडक कारवाई करण्याकचे निर्देश दिले आहेत.

विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्या जवळ काही समाजकंटकांनी श्री हनुमान मुर्तीची विटंबना व तोडफोड केल्यारमुळे विसापूर येथील गावामध्येक असंतोष निर्माण झाला. धार्मिक भावना दुखावल्यावने नागरिक संतप्तश झाले आहे. परिस्थिती चिघळू नये यादृष्टी ने पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तकक्षेप करून परिस्थिती आटोक्यापत आणावी व चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.