Home latest News करंजाडे शिवसेना (शिंदे गट) ने कोठारी इंटरनॅशनल स्कूलला दिला दणका
करंजाडे शिवसेना (शिंदे गट) ने कोठारी इंटरनॅशनल स्कूलला दिला दणका
राजाभाऊ नलवडे यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी मैदान मोकळे
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल/करंजाडे :करंजाडे येथील सिडको विकसित वसाहतीमधे आरक्षित मैदान चे भूखंड परवाना तत्वावर खाजगी संस्थेला दिले असल्याने नागरिकांना मैदान उपलब्ध नाही.त्यातच मोकळ्या जागेवर आठवडी बाजार किंवा महोत्सव सुरू असतात, अशात नागरिकांना मैदान म्हणून वावर करण्यास जागा मिळत नाही. करंजाडे शिवसेना (शिंदे गट) यांनी खाजगी संस्थेला विनंती वजा निवेदन देऊन शाळेमागे असलेले मैदान खुले करण्याची विनंती कोठारी इंटरनॅशनल स्कूल करंजाडे सेक्टर 3 चे व्यवस्थापक श्रीनिवास नायडू यांच्याशी चर्चा केली असता, सदर मैदान डिसेंबर पासून संध्याकाळी ४ नंतर सर्वासाठी खुल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
करंजाडे येथील सेक्टर १ ते ६ मधील सर्व रहिवाशांना दिलासादायक बाब असून ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना याठिकाणी आता जाता येणार आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
मिरेंद्र शहारे ( करंजाडे शहरप्रमुख),राजाभाऊ नलवडे (करंजाडे S-4 शाखाप्रमुख), अंजु सिंग( करंजाडे शहरप्रमुख महिला),राहुल सुखसे ( करंजाडे S-4 उ- शाखाप्रमुख), समाधान परदेशी ( वडघर शहरप्रमुख),मोशीन पावसे ( सोशलमीडिया उप तालुकाप्रमुख उरण) यांच्या शिष्ट मंडळाने सदर भेट घेऊन हे मैदान सुरू करण्याचं आवाहन केलं.