Home latest News चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करणे बाबत आदेश.

चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करणे बाबत आदेश.

125

चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करणे बाबत आदेश.

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

अलिबाग: चेंढरे पश्चिम येथील श्री ऋषभ मयूर अजमेरा यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत कार्यवाही प्रत्यक्ष पाहणी करून, चौकशी करून अनधिकृत भिंतीचे बांधकाम आढळून आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ ते ५७ नियमानुसार कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की श्री प्रल्हाद सुधाकर म्हात्रे यांनी लेखी स्वरुपात दिनांक ०६/१०/२०२५ रोजी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज केला होता त्यात त्यांनी श्री.ऋषभ मयूर अजमेरा व इतर यांनी मौजे चेंढरे हद्दीतील कोणतीही परवानगी न घेता रस्त्या लगत अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकाम केल्याची तक्रार केली होती.

हे बांधकाम रस्त्याच्या एकदम वळणावर उंच भिंती घालून केल्याने समोरून येणारी जाणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता स्थानिकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. यावर योग्य व कायदेशीर कार्यवाही होईल अशी आशा या हद्दीतील रहिवाशांना आहे.