तिरोडा काँग्रेस कार्यलयात महाविकास आघाडी ची सभा.
महाविकास आघाडी व काँग्रेस चे उमेदवार डॉ.प्रशांत पडोळे यांची उपस्तिथी

प्रवीण शेंड जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558.
गोंदिया : – तिरोडा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा काँग्रेस कार्यालयात आज दिनांक 26/3/2024 ला दुपारी 11 वाजता महाविकास आघाडी ची सभा आयोजित करण्यात आली त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रविकांत (गुड्डू )बोपचे, बाबा बैस, तसेच शिवसेना उद्धव गटाचे अशोक अरोरा,तिरोडा शहर आणि तालुका चे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते. या सभेला माजी आमदार काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड, रविकांत (guddu) बोपचे, यांनी संबोधित केले सरतेशेवटी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सुद्धा कार्यकर्त्यां समोर आपले विचार वेक्त केले. त्यांनी मोदी सरकार वर सळाळून टीका केली. देशात समाजात भेदभाव कसे निर्माण करने, महागाई, बेरोजगारी,आणि धर्माच्या नावावर आप आपसात द्वेष पसरविणे निर्माण करने हेच काम या मोदी आणि अमित शाह यांनी केले आहे. संविधानाला सुद्धा गालबोट लावण्याच्या प्रयत्न त्यांनी केले आहे, शेतकऱ्याचे होत असलेली पिडवणूक या सरकार कडून मोठया प्रमाणात केली जात आहे.तसेच राष्ट्रवादी पवार गटाचे रविकांत बोपचे यांनी सुद्धा संघटित होऊन भारतीय जनता पक्षाला यांची जागा दाखवण्याची हीच वेड आहे असे म्हटले.









