Home latest News ग्रामीण, आदिवासी व अतिदुर्गम भागात साहित्य चळवळ जोमाने वाढण्यासाठी आणि येथील साहित्यिकांना...

ग्रामीण, आदिवासी व अतिदुर्गम भागात साहित्य चळवळ जोमाने वाढण्यासाठी आणि येथील साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे होणारे कार्यक्रम प्रशंसनीय असून यातील गरजू साहित्यिकांना कलाकारांप्रमा णे शासनातर्फे मानधन मिळाले पाहिजे,असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले*

77

*ग्रामीण, आदिवासी व अतिदुर्गम भागात साहित्य चळवळ जोमाने वाढण्यासाठी आणि येथील साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे होणारे कार्यक्रम प्रशंसनीय असून यातील गरजू साहित्यिकांना कलाकारांप्रमा णे शासनातर्फे मानधन मिळाले पाहिजे,असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले*.विवेकानंद सभागृहात तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था, मार्डा च्या वतीने आयोजित युगस्पंदन प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशन, पुरस्कार वितरण व कवी संमेलन कार्यक्रमात उद्घाटक म्हणुन आमदार सुभाष धोटे बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध साहित्यिक अनंता सूर यांनी भूषविले. डॉ. बळवंत भोयर, सुमनताई मामुलकर, जी.प.सदस्य मेघा नलगे, कवयित्री डॉ. विशाखा कांबळे, मनोज बोबडे, नंदा अल्लुरवार,उमाकांत धांडे,सविता कोठ्ठी इत्यादी प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतिनीधी
8378848427

या कार्यक्रमात कवयित्री संगीता धोटे संपादित 65 कवितांचे संकलन असलेला प्रातिनिधिक युगस्पंदन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते राज्यस्तरीय तेजस्विनी साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माजी राज्यमंत्री स्व.वामनराव गड्डमवार स्मृतीप्रित्यर्थ कथासंग्रह पुरस्कार विलास सिंदगीकर यांना बाजार व प्रमोद पिवटे यांना मेळावा या कथासंग्रहस देण्यात आला. स्व.हनुमंत चिल्लावार स्मृतीप्रित्यर्थ कादंबरी पुरस्कार प्रमोद चोबितकर यांच्या भणंग व डॉ. विद्याधर बन्सोड यांना मुक्काम पोस्ट तेढा या साहित्य कृतीबद्दल प्रदान करण्यात आला. स्व.रामचंद्रराव धोटे स्मृतीप्रित्यर्थ प्रफुल भुजाडे यांना मनाचा मौन दरवाजा व धनराज खानोलकर यांना मास्तर मातीचे या गजलसंग्रहाबद्दल पुरस्कार देण्यात आला. माजी आमदार स्व.प्रभाकरराव मामुलकर स्मृतीप्रित्यर्थ काव्यसंग्रह पुरस्कार कवी इरफान शेख यांना माझ्यातला कवी मरत चाललाय आणि श्रीमती शांताबाई गावंडे यांचेकडून स्व . वाघुजी गावंडे स्मृतीप्रित्यर्थ बाल काव्यसंग्रह पुरस्कार सौ. मालती शेमले यांना बाग आम्हा मुलांची या बद्दल प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव संगीता धोटे, सुरेख संचालन कवयित्री सीमा भसारकर आणि आभारप्रदर्शन धर्मु नगराळे यांनी केले.
या कार्यक्रमात कवीयत्री चित्रालेखा धंदरे व कवयित्री गीता रायपुरे आणि सामाजिक कार्यकर्ता हिनेश जाधव यांना सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध कवी डॉ.किशोर कवठे यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. यावेळी कवी प्रदिप देशमुख व कवी नरेशकुमार बोरीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष अनिल धोटे,अंजुमन शेख,सुमित्रा कुचनकर, योगिता भोयर,स्नेहा मेश्राम,कल्पना थेरे,ज्योत्स्ना धोटे,माया भोयर, शिला वनकर,मंगला पिंपळकर,तुळशीबाई खडसे,सविता पिंपळकर,सविता हिवरकर,कु.अनिता मडावी यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य परिश्रम घेतले.