काटोल वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषद व तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी आंदोलन.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर/काटोल:- काटोल शहरातील लोकांच्या विविध मागण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्यात आले. अपंग बांधवांना त्यांच्या हक्काचे 5 टक्के निधी नगर पालिकाकेनी तात्काळ दयावे. प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील थकीत असलेले अनुदान नगर पलिकेने त्वरित दयावे. यासाठी नगर परिषदेवर मोर्चा काढुन मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांना निवेदन देण्यात आले.
श्रावणबाळ संजय गांधी इंदिरा गांधी व्रुद्ध निराधार योजना व कौटुंबिक अर्थ साहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांचे गेल्या 5 महिन्यापासून थकीत असलेले अनुदान त्वरित देण्यात यावे.
केशरी व पिवळे रेशनकार्ड असलेल्या लोकांना गेल्या तीन वर्षापासून मिळत नसलेले अनाज चालु करावे.
नागपुर जिल्हा ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50000रु अनुदान द्यावे व रात्रीचे शेतीच्या ओलीताच्या वेळापत्रकात बदल करावा
या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात तिव्र नारे निदर्शने करून नगर पालिकेवर व तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला दोन्ही अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर नगर पालिकेचे मुख्याधिकारी बोरीकर यांनी येत्या 15 दिवसात दोन्ही मागण्या निकालात काढण्याचे आस्वासन दिले, तर तहसीलदार अजय चरडे यांनी वृद्ध लाभार्थ्यांचे अनुदान येत्या आठ दिवसात त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.
यावेळेस या महत्वपूर्ण मागंयासंबंधी दिलेल्या मुदतीत दोन्ही अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास लवकरच काटोल शहरात मोठे आंदोलन केल्या जाईल असा इशारा दिगांबर डोंगरे यांनी निवेदनातुन दिला आहे. तसेच नगर परिषदेच्या पटांगणात उपोषणाला बसलेल्या सफाई कर्मचारी बांधवांच्या उपोषण स्थळांला वंचित बहुजन आघाडीचे नेते दिगांबर डोंगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट देवून मागणीचे समर्थन करीत आमरण उपोषण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सेवानिव्रूत्त कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जानराव गावंडे, काटोल तालुका अध्यक्ष देविदास घायवट, काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे, नरखेड तालुका प्रभारी डॉ सुनिल नारनवरे, जिल्हा प्रवक्ता सुमेध गोन्डाने, जिल्हा सदस्य श्रीकांत गौरखेडे, काटोल महिला आघाडीच्या अध्यक्षा मिनाताई पाटील, सुरेशराव देशभ्रतार, दिनेश काचेवार, दिगांबरराव भगत, संदीप माहुलकर, लक्ष्मनराव मेहर, शेखर, गोन्डाने, रामराव पाटील, ओंकार मलवे, अब्दुल कादर शेख, असलम शेख, बादल वासनिक, देवा थोटे, धर्मेंद्र राऊत, मधुकरराव आगरकर, सौ. वाहनेताई, नितीन गायकवाड, शामरावजी फाळके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.








