रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीया आठवले गटाची धाराशिव जिल्हात बैठक
समाधान सरोदे, धाराशीव प्रतिनिधी दि 27: आज रोजी महाराष्ट्र मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मतदान निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचा अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध पक्षांच्या बैठकी चे जोर वाढतो त्याच अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गट यांच्या पक्षाची बैठक होणार आहे ही बैठक उद्या दुपारी 1:00 वा शासकीय विश्रामगृह पोलिस मुख्यालया समोर धाराशिव येथे होणार आहे सदरील बैठकीत 03 नोव्हेंबर रोजी पक्षाचा वर्धापन दिन महाड येथे साजरा करण्यात येणार आहे त्या संदर्भात व होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगर पालिका नगर पंचायत निंवडणुका संदर्भात असुन आपल्या पक्षाची युती महायुती सोबत असुन जागावाटपा बाबत भाजप व मिञ पक्षा सोबत चर्चा करुन आरक्षीत जागा मागणी संदर्भात बोलनार असुन धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय जागा आरक्षना विषयी चर्चा होणार आहे
ही बैठक राजाभाऊ ओहाळ महाराष्ट् जॉईंट सेक्रटरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व विद्यानंद बनसोडे जिल्हाअध्यक्ष धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या बैठकीस प्रमुख उपस्तीथी संजयकुमार बनसोडे राज्य सचिव आनंद पांडागळे मराठवाडा कार्याध्यक्ष बंडुभाऊ बनसोडे मराठवाडा सचिव एस के चेले साहेब राज्य कार्यकारणी सदस्य भागवत शिंदे मराठवाडा उपाध्यक्ष तानाजी कदम मराठवाडा उपाध्यक्ष हारीष डावरे मराठवाडा कार्यकारणी सदस्य पोपट लांडगे मराठवाडा उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्तीथीत होणार आहे या बैठकीला येताना जिह्यातील तालुका निहाय्य सर्व तालुका अध्यक्षांनी आपल्या तालुक्यातील अहवाल घेऊन यावा इच्छूक उमेदवारांंनी आपली मागणी पक्षाकडे लेखी अर्जद्वारे करावी मिञ पक्षाशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येथील तरी या बैठकीला धाराशिव जिल्ह्यातील विविध आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन विद्यानंद बनसोडे जिल्हाअध्यक्ष धाराशिव व सिद्धार्थ ओहाळ जिल्हा सरचिटणीस धाराशिव यांनी केले आहे.









