दिवाळी सुट्टीमुळे अलिबागमध्ये प्रचंड गर्दी
भागवत जाधव, अलिबाग रायगड
८८०५०२२५६५
अलिबाग: मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील मुंबईच्या आणि पुण्याच्या जवळील अलिबाग येथे दिवाळी सुट्ट्या निमित्त पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. रस्त्यावर सगळीकडे वाहनेच वाहने दिसत आहेत हॉटेल बाजार आणि मच्छी मार्केट पर्यटकांनी फुलले आहे यानिमित्ताने व्यवसायिकांची कमाई वाढली आहे.
ट्रॅफिक जॅम चा सामान्य नागरिकांना करावा लागत आहे पार्किंगची जागा शोधताना अक्षरशः नाकी नऊ येत आहेत याचा परिणाम पोलीस यंत्रणेवर पडत आहे.चाकर मनी वेळेवर कामावर पोहोचू शकत नाही यातच भर म्हणून रस्त्यातील खड्डे व लहान वाहनांच्या तीन-तीन रांगा यामुळे ट्रॅफिक जॅम व स्लो चालू आहे.
जे एस डब्ल्यू येथील कामगारांनी सांगितले की ट्रॅफिक मुळे ते लागोपाठ तीन ते चार दिवस तब्बल एक ते दीड तास उशिरा कामावर पोहोचत आहेत. याकडे शासनाने लक्ष देऊन रस्ता रुंदी करण्याचा पर्याय लवकर शोधावा असे सांगण्यात येत आहे.









