Home latest News Panvel news:आनंदराज आंबेडकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात थेट उतरण्याचे दिले संकेत

Panvel news:आनंदराज आंबेडकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात थेट उतरण्याचे दिले संकेत

245

पनवेल येथे पक्षप्रवेश व मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

पनवेल: पनवेल येथे रिपब्लिकन सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रवेश व मार्गदर्शन शिबिराचे नवीन पनवेल येथे आयोजन करण्यात आले होते.
पक्षाचे सर्वेसर्वा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक महिला कार्यकर्त्या आणि तरुण कार्यकर्त्यांनी उत्साहाने रिपब्लिकन सेना मध्ये पक्षप्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे महत्त्व समजावून सांगितले आणि आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन केल. आतापर्यंत आपण वंचित बहुजन आघाडी ल पाठिंबा देत आलो, पण त्यांच्या, ‘ एकला चलो रे’ भूमिकेमुळे कार्यकर्ता मागे पडतो, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागा असं आदेशही दिले.
बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आपण घराघरात पोहोचलो आहोत, आमचा एक एक कार्यकर्ता तोफ आहे, अशी प्रशंसा यावेळी आंबेडकर यांनी केली.
येणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना किती आणि कुठून उमेदवार निवडणुक रिंगणात उतरणार हे पाहणे कौस्तुक्याच ठरेल.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हाधक्ष्य संतोष पवार, राष्ट्रीय सरचिटणीस संजीवन बावंधनकर , मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष गाडे ,कोकण प्रदेशाध्यक्ष विनोद मोरे, विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष राहुल गायकवाड, युवा सेना रायगड जिल्हाध्यक्ष वैभव गवळी, रायगड सरचिटणीस पंचशील सिरसाट,
पनवेल युवा तालुकाध्यक्ष शुभम रुके, खां. कॉलनी अध्यक्ष रोशन कासारे

सर्व रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आणि बौद्धजन पंचायत समिती चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.