ठाणे जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या समिती सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिवस साजरा

27

ठाणे जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या समिती सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिवस साजरा

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी संविधान दिनाचे महत्त्व, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करून संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याविषयी त्याचबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रात पारदर्शकता व जबाबदारी बाळगण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वरूणकुमार सहारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, तहसिलदार सचिन चौधर, संदीप भोसले, अमोल कदम, नायब तहसिलदार किशोर जाधव, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.