Home latest News प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र

प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र

80

प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र

काँग्रेसचे सुदाम पाटील, हरेश केनी व समाजवादी चे अनिल नाईक यांनी केली मागणी

संजय कदम

पनवेल: प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात प्रारूप मतदार यादी व हरकती हि दि. २०/११/२०२५ रोजी प्रसिद्ध झाली व प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दखल करण्याचा अंतिम दिनांक २७/११/२०२५ रोजी आहे. तरी प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी व मतदारांकडे पोचण्यासाठी हे कालावधी खूप कमी असल्याने या कालावधीत आपण मुदत वाढ करावी. असे पत्र पनवेल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हरेश केणी व समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांच्या उपस्थितीत आयुक्तांना पत्र देण्यात आले.