Home latest News चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मां उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण साहेब यांना निवेदन

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मां उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण साहेब यांना निवेदन

72

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मां उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण साहेब यांना निवेदन

त्रिशा राऊत

नागपूर क्राईम रिपोर्टर

मो 9096817953

मरेड: मौजा शिवापूर त. भिवापूर प.ह.नं. 81 येथे सरकारी तलावातुन बिना परवानगी रोज ट्रकने लाखो ब्रास माती, मुरूम उत्खनन करून लाखो रूपयाची शासकीय महसुलाची आर्थिक हानी होत असल्याबाबत उपरोक्त विषयान्वये निवेदन सादर करण्यात येते की, मौजा शिवापूर प.ह.नं. 81 येथे सरकारी तलाव असून या तलावातुन सर्व्हे क. 29/11 29/2,30/1, 30/2, 30/3, 30/4, 59/1, 59/2, 58/1, 58/24, 58/33, 58/3, 58/4, 33, 34, या सर्व्हे क्रमांकामधुन तहसिल कार्यालयाचे संगणमताने तसेच लघु सिंचन पाटबंधारे विभाग उमरेड यांच्या अशिवार्दाने दोन महिन्यापासुन अवैधरित्या, संगणमताने, बिना परवानगी दिवसा ढवळ्या ट्रक द्वारे लाखो ब्रास माती मुरूमाची अवैध वाहतुक केली जात असून हि माती उमरेड तालुक्यात खाजगी जागेवर येथील सर्व्हे क. 490, 492, 496, 511, 512 येथील लेआऊटमध्ये माती, मुरूम विकुन लाखो रूपयाचा भ्रष्टाचार सुरू आहे. शासनाच्या महसुलाचा अपहार केल्या जात आहे. यामध्ये जेसीपी पोकलॅन्ड, हायवा ट्रकच्या सहाय्याने सरकारी तलावाची अक्षरशः लुट सुरू असून पर्यावरणावर याचा गंभीर परिणाम होत आहे. ही माती जवळपासच्या शेतकऱ्यांना न देता परस्पर दुसरीकडे आर्थीक व्यवहार करून लेआऊटवाल्यांना दिल्या जात आहे.

स्थानिक प्रशासन व महसुल विभाग तसेच लघु सिंचन पाटबंधारे विभाग उमरेड हे सर्व जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने जनतेच्या मनामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाच्या मालमत्तेची सरळ सरळ लुट आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून संबधित अधिकारी तसेच भुमाफीया, जेसीपी, पोकलॅन्ड, ट्रकवाले यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे. अवैध उत्खनन त्वरीत बंद करण्यात यावे व शासनाचा महसूल वसूल करण्यात यावा. अन्यथा जनआंदोलन छेडण्याची वेळ येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी.