अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ मदत करा अन्यथा विधानसभा क्षेत्रात फिरु देणार नाही, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांना इशारा

मनोज एल खोब्रागडे
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर : 9860020016
चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा माल, वेळवा चक, सेल्लूर नागरेड्डी, सेल्लूर चक या गावाच्या अगदी काठाने उमा नदी वाहते, या गावांच्या बाजूने नाले वेढलेले आहेत, तलाव सुद्धा आहेत. यावर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाले. परंतु येथील महसूल प्रशासनातील जिम्मेदार अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी,कृषी सहाय्यक यांच्या दुर्लक्षितपणामुळे शासनाने जाहीर करण्यात आलेल्या शेतपिक नुकसानीच्या लाभापासून वरील गावातील शेतकरी वंचित राहिले आहेत.
याचा आक्रोश तहसील कचेरीवर करण्यात आला. मात्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा तालुक्यातील शेतकरी मतदार बांधवांच्या भरवश्यावर सातत्याने निवडणूकीत जिंकतात, मंत्रीही होतात पण याच शेतकऱ्यांकडे पुरते दुर्लक्ष केले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. केवळ शेतकऱ्यांची यांना मते चालतात पण अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान होऊन हवालदिल झालेल्या शेतकर्यांना मदत करता येत नाही. शेतकऱ्यावर उपोषण करण्याची वेळ येते ही लाजिरवाणी बाब पोंभूर्णा तालुक्यात पाहायला मिळते. त्यामुळे येथील शेतकरी उपोषण सुरु केलंय. याची तात्काळ दखल घेऊन रास्त मागण्या पुर्ण कराव्या अन्यथा पालकमंत्र्यांना विधानसभा क्षेत्रातील पोंभूर्णा तालुक्यात फिरु देणार नाही. अशी ठोस भुमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
उपोषण कर्त्यांचे नेतृत्व रुपेश निमसरकार, अजय लोणारे, विनोद जाधव, पंकज वडेट्टीवार, श्रीकृष्ण चलाख आदींनी करीत आहेत.








