Home latest News महाड एसटी स्थानकातून दुचाकीची चोरी

महाड एसटी स्थानकातून दुचाकीची चोरी

82

महाड एसटी स्थानकातून दुचाकीची चोरी

महाड एसटी स्थानकातून दुचाकीची चोरी

✍ रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड एस टी स्थानकाचे आवारात वॉचमन केबिन शेजारी लावून ठेवलेल्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी चोरून नेणार्‍या चोरट्याच्या हालचाली सीसीटिव्ही कॅमेर्‍यात टिपल्या गेल्या आहेत.
महाड एसटी आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी आपली अव्हेंजर बजाज मोटार सायकल क्रमांक एम एच ०६ बीक्यू २८४३ ही स्थानक परिसरात २६ एप्रिल रोजी सायंकाळी पार्क करून ठेवून ते बाहेरगावी एक लग्न समारंभासाठी गेले होते. दि.२६ व २७ एप्रिल च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने वॉचमन केबीन शेजारी पार्क केलेली ही दुचाकी घेऊन पोबारा केला. २८ एप्रिलला सकाळी एसटी स्थानकात आल्यानंतर आपली दुचाकी जाग्यावर नसल्याचे लक्षात आल्याने शिवाजी जाधव यांनी सर्व परिसरात तपासणी करुन मित्र परिवाराकडे चौकशी केल्यानंतरही दुचाकीचा शोध न लागल्याने त्यांनी त्या रात्रीचे सीसी टिव्हीचे फुटेज चेक केले. यामध्ये एक तरुण दुचाकीशी छेडछाड करताना व ती पळवून नेत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी जाधव यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
महाड एस टी स्थानक बाहेरगावी जाणारे त्याच बरोबर एमआयडीसीत रात्र पाळीला जाणारे कामगार आपल्या गाड्या पार्क करून जात असतात त्यांच्या गाड्याही चोरीस जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या परिसरात वाहने पार्क करू नयेत असे आवाहन आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी केले आहे.