पंतप्रधान साधणार चंद्रपुरातील लाभार्थ्यांशी संवाद
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ मे २०२२ रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील त्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या शिमला येथील कार्यक्रमाशी जिल्ह्याला जोडले जाणार असून जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात केले आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम दोन भागांमध्ये होईल. यात संवादाचा पहिला भाग जिल्हा कार्यक्रमाच्या स्वरूपात सकाळी १०.१५ वाजता सुरू होऊन सकाळी १०.५० वाजता त्याचा समारोप होईल. यावेळी पीएम सन्मान निधीचा ११ वा हप्ता लाभार्थ्यांना हस्तांतरित केला जाईल.